व्हॅलेंटाईन डे उद्या सर्वत्र साजरा केला जाईल. आपल्या प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रेमीयुगुलांचा यावेळी प्रयत्न असतो. मग यात बॉलीवूडकर तरी कसे मागे राहतील. बॉलीवूडमधील एलिजिबल बॅचलर असलेल्या बाजीरावने म्हणजेच रणवीरने आपल्या मस्तानीला (दीपिका) यंदा चकित करायचे ठरविले.
सध्या दीपिका पदुकोण ‘xXx 3’ या हॉलीवूड चित्रपटासाठी टोरंटोमध्ये चित्रीकरण करत आहे. दरम्यान, रणवीरही आपल्या तथाकथित प्रेयसीला भेटण्यसाठी टोरंटोला गेला. तेथे पोहचताच रणवीर ‘xXx 3’ च्या सेटवर गेला. त्याला पाहून दीपिकाला आनंद झाला असेल याबाबत काही शंका नाही. या चित्रपटाचा दिग्दर्शक डीजे कारुसो याने रणवीर-दीपिकासोबतचा फोटो ट्विट केला असून त्याने लिहले की, सेटवर आज एक खास व्यक्ती आली. रणवीर सिंग आणि आनंदी असलेली दीपिका पदुकोण.


‘xXx 3’ या चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. विन डिझेलसोबत निना डोब्रेव, सॅम्युल जॅक्सन, रुबी रोझ, जेट ली आणि टोनी जा यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader