बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'कुली नंबर १'च्या रिमेकचे टीझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे मोशन पोस्टर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केले आहे. दरम्यान त्यांनी चित्रपटाचे मुख्य पोस्टर १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपट १ मे २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारण्यात आला आहे. 'ओळखा पाहू कोण येत आहे?' त्यानंतर लाल शर्ट आणि पांढरी पॅन्ट परिधान करुन एक मुलगासमोर येतो आणि त्या मुलाच्या हातात ३-४ बॅग असल्याचे दिसत आहे. त्या बॅगा तो पकडून तो स्वत:चा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बॅगांमुळे त्या मुलाचे तोंड लपले गेले आहे. त्यामुळे तो चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा वरुण धवन असू शकतो असे निष्कर्ष लावण्यात आले आहेत. Varun Dhawan and Sara Ali Khan. Teaser poster of #CoolieNo1. Main posters will be out tomorrow [Mon]. Filming has commenced in #Bangkok. Directed by David Dhawan. Produced by Vashu Bhagnani, Jackky Bhagnani and Deepshikha Deshmukh. 1 May 2020 release. pic.twitter.com/z9C7OA5BHW — taran adarsh (@taran_adarsh) August 11, 2019 तरण आदर्श यांनी नंतर कूली नंबर १ चे आणखी एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये बॅगा पकडलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून वरुण धवन असल्याचे स्पष्ट झाले आहे. Varun Dhawan and Sara Ali Khan. New motion poster of #CoolieNo1. Directed by David Dhawan. Produced by Vashu Bhagnani, Jackky Bhagnani and Deepshikha Deshmukh. 1 May 2020 release. pic.twitter.com/1x2h0vgN0N — taran adarsh (@taran_adarsh) August 12, 2019 या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये एका बाजूला वरुण धवन आणि एका बाजूला सारा - वरुण दिसत आहे. या पोस्टरवरुन चित्रपटात सारा आणि वरुणची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. Varun Dhawan and Sara Ali Khan. Two new posters of #CoolieNo1. Directed by David Dhawan. Produced by Vashu Bhagnani, Jackky Bhagnani and Deepshikha Deshmukh. 1 May 2020 release. pic.twitter.com/In8lT0tYK0 — taran adarsh (@taran_adarsh) August 12, 2019 नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विनोदी चित्रपटांची एक लाटच त्याकाळी आली आणि गोविंदा रातोरात सुपरस्टार विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. त्यानंतर आपल्या समकालिनांप्रमाणे पुन्हा एकदा चित्रपटात नशीब आजमावून पाहण्याचा गोविंदाने केलेला प्रयत्न फसला असला तरी त्याच्या चित्रपटांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे गोविंदाच्या या चित्रपटांचे निर्माते वाशू भगनानी यांनी गोविंदाच्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक म्हणजे ‘कुली नंबर १’चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला.