देशातील करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळेच क्रिडा आणि मनोरंजन सृष्टीमधील अनेक सेलिब्रिटी आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असून ते लॉकडाउनदरम्यान काय करत आहेत याबद्दलचे फोटो आणि माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. अभिनेत्री करीना कपूरही मागील अनेक दिवसांपासून आपल्या इन्स्ताग्रामवर घरात वेळ कशी घालवत आहे याबद्दलचे फोटो शेअर करत आहे. यामध्ये पती सैफ अली खानबरोबर तैमुरचेही काही फोटो करिनाने शेअर केले आहेत. नुकतेच करिनाने तैमुरने काढलेल्या चित्राचा फोटो आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरुन शेअऱ केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लॉकडानचा फटका चित्रपट उद्योगाला बसला आहे. चित्रपटांचे चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले असून सर्व सेटवर काम बंद आहे. त्यामुळेच सर्व कलाकार घरीच होम क्वारंटाइनमध्ये आहेत. याच होम क्वारंटाइनदरम्यान करीनाने तैमुर काय करत आहे हे सांगताना त्याने काढलेल्या चित्राचा फोटो पोस्ट केला आहे. तैमुरने काढलेल्या आइस्क्रीमच्या या फोटोला तिने ‘हा आमच्या घरातील इन-हाऊस पिकासो आहे’, असं कॅप्शन दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच तैमूर सैफबरोबर एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये दिसला होता. याआधीही करिनाने तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन तैमूर आणि सैफचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना हजारोच्या संख्येने लाईक्स मिळाले होते.

करीनाने लॉकडाउनदरम्यान केलेल्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनी घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. करीना स्वत: घरी काय करते यासंदर्भातील अपडेट्सही ती इन्स्ताग्रामवरुन देत असते. यामध्ये अगदी घरच्याघरी व्यायाम करण्यापासून ते आपल्या मैत्रिणींबरोबर व्हिडिओ कॉलवर गप्पा मारल्याची माहितीही तिने फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिली आहे.