करोना विषाणूने जगभरात हातपाय पसरल्यामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. जगातील हजारो लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत जवळपास दिड लाखापेक्षा अधिक जणांना या विषाणूची लागण झाल्याचं म्हटलं जातं आहे. भारतातदेखील १०० पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांवर उपचार सुरु असून यातील ११ जणांनी रुग्णालयातून पलायन केल्याचं सांगण्यात येत आहे. हे रुग्ण पळाल्यामुळे सध्या या गोष्टीची चर्चा रंगत असून अभिनेता रितेश देशमुख आणि बिपाशा बासूने संताप व्यक्त केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात जवळपास १०० पेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. या रुग्णांवर उपचार सुरु असून सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ११ जणांनी रुग्णालयातून पळ काढल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे. त्याने आणि बिपाशाने ट्विटरवर त्यांचं मत मांडत या रुग्णांचा हा बेजबाबदारपणा असल्याचं म्हटलं आहे.

“हे लोक इतके बेजबाबदार कसे असू शकतात? देशाचा एक नागरिक म्हणून आपल्याला सतर्क होण्याची गरज आहे. त्यामुळे असा बेजबाबदारपणा न करता परिस्थितीचं भान राखत सरकारची मदत करायला हवी”, असं अभिनेत्री बिपाशा बासूने म्हटलं आहे. तर रितेशनेही त्याचं मत मांडतं आगपाखड केली आहे.
वाचा :

“हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षणं आहे. सरकार आणि वैद्यकीय अधिकारी तुमची मदत करतायेत, त्यांना ती करु द्या. या आजारामुळे जर तुम्हाला एकटं रहावं लागत आहे, तर ते तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मित्रपरिवारासाठी, घराताल्यांसाठी करतायं. त्यामुळे येथे तुमच्यावर योग्य उपचार होतील. आपण सारेच सध्या सैनिक आहोत आणि या विषाणूविरुद्धची लढाई आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून लढायची आहे. इंडिया युनाइटेड”, असं रितेश म्हणाला.


दरम्यान, नवी मुंबईमधील सरकारी रुग्णालयातून ११ जणांनी पळ काढला आहे. या ११ जणांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्याचे रिपोर्ट्स येण्यापूर्वीच या रुग्णांनी आयसोलेशनमधून पळ काढला. सध्या या ११ जणांचा शोध सुरु आहे.

Story img Loader