करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले असून विलगीकरणासाठी आपल्या कार्यालयाची इमारत देण्याची ऑफर महापालिकेला दिला आहे. शाहरुख खानने वांद्रे येथील आपली चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी देण्यास तयार आहोत असं मुंबई महापालिकेला सांगितलं आहे. या ठिकाणी सर्व गरजेच्या वस्तूदेखील आहेत. शाहरुख खान आणि गौरी खानने मदतीचा हात पुढे केल्याने महापालिकेने त्यांचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी महापालिकेने शाहरुख आणि गौरी खानचे आभार मानणारं ट्विट केलं. या ट्विटमध्ये महापालिकेने म्हटलं आहे की, “आपली चार मजली कार्यालयीन इमारत ज्यामध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांसाठी गरजेच्या सर्व गोष्टी आहेत ती विलगीकरणासाठी देण्याची ऑफर दिल्याबद्दल शाहरुख आणि गौरी खानचे आभार”.

यााधी शाहरुख खानने २ एप्रिल रोजी करोनाशी लढा देण्यासाठी पुढाकार घेत मदत जाहीर केली होती. यावेळी त्यांनी आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिल्लीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX डून सात संस्थांना निधी देत असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना तसंच १० हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी २००० जणांचं जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगार आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान इतकी मदत शाहरुखने जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus shahrukh khan offered office building for quarantine facilities sgy