‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांमधून एकत्र झळकलेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमा परिसरात या दोघांनी एका व्हिलामध्ये पारंपारिक पद्धतीने पण तेवढ्याच थाटामाटात हा लग्नसोहळा केला. दीप-वीच्या लग्नातील प्रत्येक गोष्ट खास होती. त्यामुळे दीपिकाने लेहंग्याची निवडदेखील त्याच पद्धतीने केल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोंकणी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने पार पडलेल्या या लग्नामध्ये दीप-वीरच्या कपड्यांची बरीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. दीपिकाने लग्नात परिधान केलेला लेहंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केला होता.विशेष म्हणजे या लेहंग्यावर दीपिकाने ओढलेल्या दुपट्ट्यावर सदा सौभाग्यवती भव असं लिहीलं होतं.

दीपिकाने परिधान केलेल्या गोल्डन-रेड कॉम्बिनेशन असलेल्या या लेहंग्याची किंमत तब्बल ८.९५ लाख रुपये असल्याचं पिंकव्हिलाने म्हटलं आहे. दीपिकाने सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नाच्या विधींमध्ये हा लेहंगा घातला होता. तर रणवीरने कांजीवरम शेरवानी घातली होती.

दरम्यान, हा लग्नसोहळा कायम स्मरणात रहावा यासाठी दीपिका-रणवीरने पुरेपूर प्रयत्न केला असून ते लवकरच मुंबईमध्ये परतणार आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी मित्र-परिवारासाठी स्वागतसमारंभाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलमध्ये हा स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आला आहे.