प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे दाखल तक्रारीच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शनिवारी स्पष्ट नकार दिला. तर दुसरीकडे सुनावणीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करणाऱ्या प्रीतीला अंधेरी न्यायालयानेही दणका देत १० हजार रुपयांचा दंड सुनावला.
‘इश्क इन पॅरिस’ या चित्रपटाचे पटकथा लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतीविरुद्ध १८.९ लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी अंधेरी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्या विरोधात प्रीतीने उच्च न्यायालयात धाव घेत महानगरदंडाधिकाऱ्यांसमोरील तक्रारीच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनी याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस प्रीतीला अंतरिम दिलासा देण्यास नकार देत प्रकरण जानेवारीपर्यंत तहकूब केले.
प्रीती झिंटाला न्यायालयाचा दणका
प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे दाखल तक्रारीच्या कारवाईला स्थगिती देण्यास
First published on: 22-12-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court fines preity zinta for seeking adjournment