‘हॉटेल ताजमहाल’मध्ये दोन वर्षांपूवी अनिवासी उद्योगपतीशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान याच्याविरुद्ध महानगरदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी आरोप निश्चित केले. सैफसोबत त्याच्या दोन मित्रांवरही या वेळी आरोप निश्चित करण्यात आले. सैफला जर न्यायालयाने दोषी ठरविले तर त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी सैफ हा पत्नी करिना व मित्रांसोबत ‘हॉटेल ताजमहाल’च्या ‘वसाबी’ रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेला होता. त्यांच्या गप्पा रंगल्या असतानाच शेजारी बसलेल्या इक्लाब शर्मा या अनिवासी भारतीयाने त्यांना हळू आवाजात बोलण्यास सांगितले. याच मुद्दय़ावरून सैफ व त्याच्या मित्रांचा इक्लाबशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी इक्लाबला मारहाण केल्याने त्याने सैफविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

Story img Loader