ताज हॉटेलमधील मारहाणीप्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर अभिनेता सैफ अली खानसह अन्य दोघांवर न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणावर आता ३० एप्रिलपासून सुनावणीला सुरूवात होणार आहे.
सरकारी वकील वाजीद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताज हॉटेलमध्ये केलेल्या मारहाणी प्रकरणी अभिनेता सैफ अली खानसह त्याचे दोन मित्र- शकील लडाक आणि बिलाल अमरोही यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ३२५ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फेब्रवारी २०१२ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा उद्योगपती इक्बाल शर्मा याला सैफ अली खानने मारहाण केली होती. यामध्ये इक्बाल दुखापतग्रस्तही झाला होता. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सैफला अटकही करण्यात आली होती. मात्र, लगेच त्याची जामीनावर सुटकाही झाली होती.