मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत करोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकरने सुद्धा तिथे हजर होती. त्या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या पार्टीत कॅनेडियन रॅपर एपी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणानी थिरकताना दिसली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पार्टीत सारा तेंडुलकरसोबतच सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि जान्हवी कपूर हे उपस्थित होते. पार्टीमध्ये करोनाचे नियम न पाळल्याने या पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सध्या या सेलेब्रिटींचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…
आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
आयोजकांवर मुंबई पोलिसांनी FIR दाखल केली आहे. सारा तेंडुलकरचा देखील या पार्टीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकरची लेक साराने नुकतच मॉडेलिंग विश्वात पदार्पण केलं आहे. त्यानंतर लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत.