अभिनेत्री बिपाशा बासूची भूमिका असलेला ‘क्रिचर ३डी’ हा चित्रपट जून महिन्यात चित्रपटगृहात झळकणार अशी चर्चा होती. परंतु, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून, या वर्षी १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘यारियां’ आणि ‘भूतनाथ रिटर्नस्’ चित्रपटानंतर टी-सिरिज बीव्हीजी फिल्म्सच्या सहयोगाने विक्रम भट दिग्दर्शित ‘क्रिचर ३डी’ हा ‘साय-फाय थ्रिलर’ प्रकारातील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाद्वारे इमरान अब्बास चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असून, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी १२ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ‘हॉन्टेड’ चित्रपटानंतर विक्रम भटचा हा दुसरा ३डी प्रकारातील चित्रपट असून, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करून यातील भयानक प्राणी साकारण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे.

‘जुरासिक पार्क’ या विशालकाय डायनासोरवर आधारित हॉलिवूडपटाशी मिळताजुळता असा हा चित्रपट आहे. अशा प्रकारच्या विशालकाय जिवांवर बनविण्यात आलेला ‘क्रिचर’ हा भारतातील पहिला चित्रपट आहे. भारतात विशालकाय डायनासोर अथवा अशाच प्रकारच्या अन्य जिवांवर कधीही चित्रपट बनविण्यात आलेला नाही. ‘क्रिचर’ हा चित्रपट ‘ज्युरासिक पार्क’सारखा असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘प्रसाद लॅब्स’ने केली असून, हा चित्रपट थ्री डी आयमॅक्समध्ये उपलब्ध होणार आहे. भयानक आणि विशालकाय जिवांचे अस्तित्व असणा-या एका भयानक जंगलात ‘क्रिचर’चे चित्रिकरण करण्यात आले आहे. चित्रपटात बिपाशा बसू प्रमुख भूमिकेत असून, बिपाशा आणि विक्रम भट तिस-यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘राज’, ‘राज-३’ या चित्रपटांमध्ये बिपाशा आणि विक्रमने एकत्र काम केले आहे.
याबाबतचे चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी केलेले टि्वट –

Story img Loader