भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. हिनाया हीर प्लाहाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरभजनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. हे फोटो पाहून अनेकांनीच कमेंटबॉक्समध्ये भज्जीच्या लाडक्या परीराणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हरभजन- गीताच्या कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण करणारी हिनाया या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसत असून, या खास दिवसासाठी सुरेख सजावट करण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हिनायाचा पहिला वाढदिवस पार पडला. यावेळी भज्जीच्या चेहऱ्यावरून आनंद पाहण्याजोगा होता. तो नेहमीच हिनायासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामुळे भज्जीच्या चाहत्यांमध्ये त्याच्या या लाडक्या परीराणीबद्दलही कुतूहल पाहायला मिळतं.

https://www.instagram.com/p/BXDXwPJl1pS/

https://www.instagram.com/p/BXCpI8gl7XS/

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

https://www.instagram.com/p/BXCxwrLFyOB/

लग्न झाल्यापासूनच हा फिरकी गोलंदाज एक फॅमिली मॅन झाला असून, आपल्या करिअरसोबतच तो पत्नी आणि मुलीलाही योग्य वेळ देत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका मुलाखतीत हिनायाचं त्याच्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे हे स्पष्ट केलं होतं. ‘माझी मुलगी मोठी होतेय. त्यामुळे मला तो प्रत्येक क्षण अनुभवायचा आहे. गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नाही. पण, मी लवकरच मैदानात उतरेन. अर्थात ते काही माझं पुनरागमन नसेल. कारण मी गेल्या १८- १९ वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. मी आयुष्यात आतापर्यंत जे काही मिळवलंय किंवा भविष्यात मिळवेन ते सर्व माझ्या कुटुंबासाठीच असेल’, असं तो या मुलाखतीत म्हणाला होता.

Story img Loader