भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां सध्या चर्चेत आहेत. २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं, २०१८ मध्ये हसीनने शमीवर घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे काही गंभीर आरोप केले होते, त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. दोघांनी अजूनही घटस्फोट घेतलेला नाही. हसीन आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एक्सप्रेसमधील तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्यावर तिने आरोप केल्याचं समोर आलं आहे.
शुक्रवारी हसीनने रेल्वेच्या तिकीट तपासणाऱ्या स्टाफवर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार गुरुवारी बिहार ते कलकत्ता ट्रेनमधून प्रवास करणाताना तिच्याशी गैरव्यवहार झाल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. हसीन आपल्या नातेवाईकांच्या एका लग्नसोहळ्यासाठी बिहार ते कलकत्ता प्रवास करत होती.
आणखी वाचा : प्रभासच्या आगामी ‘सालार’ चित्रपटात झाली पृथ्वीराजची एंट्री; फर्स्ट लूक व्हायरल
कलकत्त्याला जाणाऱ्या जोगबानी एक्सप्रेसमध्ये हसीनला बरचा बर्थ मिळाला होता, खरंतर खालची जागा रिकामी असल्याने एका सहप्रवाशाचया संमतीने हसीन खालच्या बर्थवर बसली होती. रात्रीच्या दरम्यान मालदा स्टेशनजवळ रेल्वेच्या काही तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिच्याशी गैरव्यवहार केला आणि अभद्र भाषेचा वापरही केल्याचं हसीनने स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर त्या लोकांनी तिचा मोबाईलही फेकून दिला. नंतर फरक्का रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये हसीनने याबाबत तक्रार नोंदवली.
२०१८ मध्ये हसीनने शमीवर असेच गंभीर आरोप लावले होते. घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि मॅच फिक्सिंग यासारखे गंभीर आरोप तिने शमीवर लावले होते.यापैकी कोणताही आरोप अजून सिद्ध झालेला नाही. बीसीसीआयने चौकशी करून शमीला निर्दोष ठरवून त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे. हसीन लग्नाच्या आधी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. तिने काही काळ मनोरंजनसृष्टीतही काम केलं आहे.