भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. टी२० विश्वचषक जिंकणारा महेंदसिंग धोनी हा पहिला कर्णधार आहे. भारताला त्याने क्रिकेटमधील सर्व प्रकारात एका उंचीवर नेऊन ठेवले. आयसीसीचे तीन महत्वाचे चषक त्याने जिंकून दिले आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. क्रिकेटनंतर तो त्याची नवी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या खेळपट्टीवर धुमाकूळ घातल्यानंतर तो मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहे. एका मोठ्या चित्रपट निर्मात्याशी त्याने बोलणी केली असून तो लवकरच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार आहे. महेंद्रसिंग धोनी तामिळ चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज झाला आहे.

आणखी वाचा : ‘दृश्यम २’मध्ये होणार एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी टीमची एंट्री, ‘असा’ करणार केसचा तपास

धोनीने काही महिन्यांपूर्वी त्याच्या स्वतःच्या ‘धोनी एंटरटेन्मेंट’ या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली होती. तेव्हाच त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण आता पहिल्यांदाच तो अभिनय करताना दिसणार आहे. धोनी लवकरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटात तो एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. या बातमीनंतर चाहते धोनीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा : “तेव्हा शाहरुखने मला…”; अभिषेक बच्चनने जागवल्या स्ट्रगलच्या काळातल्या आठवणी

लोकेश कनगराज त्यांच्या बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटात धोनीने महत्वपूर्ण भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा आहे. पण यासोबतच अशीही बातमी समोर आली आहे की, या तमिळ चित्रपटात एमएस धोनी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. तर यात थलपथी विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या चित्रपटाचे जाहीर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer ms dhoni is all set to enter in south film industry rnv