क्रिकेट आणि बॉलिवूडचं एक वेगळं नातं आहे. सचिनपासून ते विराटपर्यंत अनेक क्रिकेटपटू मैदानात जितके गाजले तितकेच ते जाहिरातींमधून गाजले आहेत. विनोद कांबळी, अजय जडेजा यांसारख्या अभिनेत्यांनी केवळ जाहिरातीत काम न करता चित्रपटातदेखील आला ठसा उमटवला आहे. महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दिन या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपटदेखील आले आहे. भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे आता पाकिस्तानी खेळाडू चित्रपटात दिसणार आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम ज्याला आपण समालोचक म्हणून बघत आलो आहोत तोच आता एका पाकिस्तानी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘एमबीजी’ ( मनीं बॅक गॅरंटी). नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फवाद खान, फैसल कुरेशी, मिकाल जुल्फकारी, जावेद शेख, हिना दिलपझीरो आणि आयेशा उमरी यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट चोरीच्या घटनेवर आधारित आहे असे म्हणता येईल. एमबीजी चित्रपटाचे चित्रीकरण कराची, पाकिस्तान आणि थायलंडमध्ये झाले आहे. ट्रेलरमध्ये वसीम अक्रमची झलकही पाहायला मिळाली आहे.
“म्हणून मी सलमानला …” ऊंचाई चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बडजात्यांनी केला खुलासा
वसीम अक्रमने आजवर अनेक विक्रम केले आहेत. वसीम मूळचा लाहोरचा असून १९८४ त्याने आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीला सुरवात केली आहे. ३५ यावर्षीचा असताना २००३ च्या विश्वचषकानंतर अक्रमने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अक्रमने यापूर्वी २००२ मध्ये कसोटी क्रिकेट सोडले होते.
निवृत्तीनंतर, बर्याच माजी क्रिकेटपटूंप्रमाणे तो समालोचकाच्या रूपात दिसला आहे. आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्सचा तो प्रशिक्षकदेखील होता. टीव्ही जगतातील कपिल शर्माच्या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने आपल्या क्रिकेटमधील आठवणींना उजाळा दिला होता.