बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत एनसीबीने १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला अटक करण्यात आली. पण अरबाज मर्चंट आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्यन खानला अरबाज मर्चंटने क्रूझवर आणले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनेक ड्रग्ज पार्ट्यांना अरबाज हजेरी लावत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरबाज मर्चंटचा फोनमधील चॅटवरुन ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. पण अरबाज कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Two arrested on charges of kidnapping and demanding Rs 25 lakhs
अपहरण करून २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
Sunil Pal and Mushtaq Khan abduction case
Sunil Pal and Mushtaq Khan Abductions Case : सुनील पाल आणि मुश्ताक खान अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण

आणखी वाचा : रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेणारे समीर वानखेडे पुन्हा चर्चेत; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे आहेत पती

अरबाज हा आर्यन खान आणि सुहाना खानचा मित्र आहे. तो एक अभिनेता आणि इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. बऱ्याच वेळा अनेक स्टारकिड्ससोबत तो पार्ट्यांमध्ये दिसला आहे. आर्यन आणि अरबाज जवळपास गेली १५ वर्षे मित्र असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबाज मर्चंट अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया एफला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

नेमकं प्रकरण काय?
अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती. माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.

Story img Loader