अभिनेता मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे. आता या चित्रपटामधील अभिनेता अंकुश चौधरीचा (Ankush Chaudhari) लूक समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “पैसे खाल्ले की नाही…” संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर आरोह वेलणकरचं ट्वीट चर्चेत

‘दगडी चाळ २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अरुण गवळी यांच्या लूकमधील मकरंद देशपांडेंना पाहून सारेच जण भारावून गेले. ‘दगडी चाळ २’च्या टीझरमुळे चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीनच वाढली. ‘दगडी चाळ’मध्ये सूर्याची भूमिका साकारणारा अंकुश प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. आता या दुसऱ्या भागामध्ये त्याचा नेमका कोणता अवतार पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

‘दगडी चाळ २’च्या नव्या पोस्टरमध्ये अंकुश सूर्याच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर राग, भेदक नजर असा अंकुशचा लूक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसंच पोस्टरवरील “आय हेट यू डॅडी” ही ओळ विशेष लक्ष वेधून घेत आहेत. म्हणजे सूर्या आणि डॅडीमध्ये चित्रपटाच्या दुसऱ्या भागात भांडण-तंटा होणाऱ असल्याची चिन्ह दिसताहेत.

आणखी वाचा – “बालपणापासूनच मी संघ स्वयंसेवक” ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकांनी मोहन भागवतांबाबत शेअर केलेली पोस्ट चर्चेत

‘दगडी चाळ’च्या पहिल्या भागामध्ये डोकं वापरून काम करणारा सूर्या अरुण गवळी म्हणजे डॅडींचा उजवा हात बनला. मात्र यावेळी ‘आय हेट यू डॅडी’ असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत आहे. आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय? याचे उत्तर ‘दगडी चाळ २’ पाहिल्यावरच मिळेल. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित तसेच चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ चित्रपट १८ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daagdi chaawl 2 marathi movie actor ankush chaudhari look release new poster viral on social media see details kmd