अभिनेता मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील महत्त्वाच्या कलाकारांचे लूक समोर येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच अभिनेत्री पूजा सावंत हिचा दगडी चाळ २ या चित्रपटातील लूक समोर आला आहे.

‘दगडी चाळ २’ ची घोषणा झाल्यापासूनच यात कोणते चेहरे झळकणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यानंतर आता हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले आहे. नुकतंच प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्याबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसल्याचेही दिसत आहे.

young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण
The viral video of the elephant attacking people is from the Puthiyangadi festival at BP Angadi mosque in Malappuram district
केरळमध्ये उत्सवादरम्यान पिसाळला हत्ती! व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकले; थरारक घटनेचा Video Viral

Daagdi Chaawl 2 Teaser : ही इज बॅक! बहुप्रतिक्षित ‘दगडी चाळ २’चा टीझर प्रदर्शित

‘दगडी चाळ २’मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवरुन यात एक कौटुंबिक कहाणी पाहायला मिळणार असे बोललं जात आहे. यातील एका पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ असं म्हणत आहे.

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अंशुमन हा सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ असे म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने ‘डॅडीं’ची साथ सोडली का? सूर्या अजूनही ‘डॅडीं’चा उजवा हात आहे का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. पण याची उत्तरं ‘दगडी चाळ २’ पाहिल्यावरच कळणार आहे.

Daagdi Chaawl 2 Poster : “आय हेट यू डॅडी” ‘दगडी चाळ २’मधील अंकुश चौधरीचा लूक पाहिलात का?

दरम्यान चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी केली आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Story img Loader