‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप एका रोमॅंटीक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. चित्रपट निर्माता अनुराग कश्यपचा भाऊ अभिनवने सलमान खान सोबत ‘दबंग’च्या सिक्वेलचे दिग्दर्शन केले होते व तो गाजला देखील. तो सध्या रणबीर कपूरची भूमिका असलेल्या ‘बेशरम’वर काम करत असून चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी देखील अभिनवने स्वत: उचलली आहे.
‘बेशरम’ व्यतिरिक्त अभिनव आणखी एका चित्रपटावर काम करत आहे.
“हा एक रोमॅंटीक-म्युझिकल ड्रामा असून, त्याचे नाव ‘क्रेझी मुंडा’ असे आहे. या चित्रपटाची कल्पना अतिशय नवीन आहे. चित्रपटाचे चित्रिकरण पंजाब आणि युरोपमध्ये होणार आहे,” असे या चित्रपटावर काम करणा-या सूत्रांनी सांगितले.
टीएनटी एंटरटेनमेंटच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाची पटकथा ‘यमला पगला दिवाना’चे पटकथालेखक जसविंदर सिंग यांनी लिहिली आहे.

Story img Loader