लेडी गागा, टेलर स्विफ्ट आणि ‘सालाबादप्रमाणे यंदाही’ थाटात ग्रॅमी पुरस्कारांवर हमखास मोहोर उमटविणाऱ्या अमेरिकी महारथींची सद्दी रविवारी झालेल्या यंदाच्या ५६ व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये संपुष्टात आल्याचे चित्र होते. फ्रान्सचे डाफ्ट पंक संगीतयुगूल आणि न्यूझीलंडची १७ वर्षीय ललना लॉर्ड हिने संगीतातील सर्वोच्च समजले जाणारे सर्व पुरस्कार खिशात घातले. फ्रान्सच्या डाफ्ट पंक या टोपण नाव घेतलेल्या संगीतकार जोडीच्या ‘रँडम अॅक्सेस मेमरीज’ या अल्बमला सवरेत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार मिळाला. त्यांच्याच ‘गेट लकी’ या संगीत ट्रॅकला यंदाच्या वर्षांतील सर्वात चांगली संगीत रेकॉर्ड (दृकश्राव्य फीत) म्हणून पुरस्कार मिळाला. फॅरेल विल्यम्स यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे फ्रान्सला दुहेरी यश तर मिळाले आहेच, शिवाय डाफ्ट पंक यांना या वर्षी एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. डाफ्ट पंक जोडीने एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार पटकावून फ्रान्सचे वर्चस्व सिद्ध केले. न्यूझीलंडच्या सतरा वर्षीय गीतकार व गायिका लॉर्ड हिने वर्षांतील उत्तम गाणे व वर्षांतील एकाच कलाकाराची उत्कृष्ट कामगिरी यासाठी रॉयल या अल्बमच्या माध्यमातून दोन ग्रॅमी पुरस्कार पटकावले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा