सध्या बॉलिवूड चित्रपटांबाबत बॉक्स ऑफिसवर वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील अगदी टॉपच्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. एकीकडे हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. ‘चंद्रमुखी’, ‘टाइमपास ३’, ‘धर्मवीर – मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘पावनखिंड’ सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रचंड गाजले. पण त्याचबरोबरीने गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे.

आणखी वाचा – “जर मी तुम्हाला आवडत नसेल तर…” ट्रोलर्सला आलिया भट्टचं सडेतोड उत्तर, अभिनेत्रीचा राग अनावर

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…

२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘दगडी चाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. आता ७ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये चंद्रकांत कानसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ चित्रपट यशस्वी ठरला आहे. चित्रपटामधील संवाद तर प्रेक्षकांना भलतेच आवडले आहेत.

इतकंच नव्हे तर ‘दगडी चाळ २’ ३५० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. दहीहंडीच्या ऐनमोक्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या अवघ्या ३ दिवसांमध्येच चित्रपटाने दोन कोटींपेक्षा अधिक कमाई केली. शुक्रवार (१९ ऑगस्ट) पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० लाखांपेक्षा अधिक कमाई केली. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

आणखी वाचा – Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ

चुकीला माफी नाही म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.