वैशाली सामंत हिच्या आवाजातील ऐका दाजिबा हे गाणं २००२ साली तुफान गाजलं. आजही लग्नकार्यामध्ये हे गाणं आवर्जुन लावलं जातं. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी झळकली आहे. मिलिंद गुणाजी यांचा रांगडेपणा आणि इशिताच्या चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे या जोडीने अनेकांची मनं जिंकली. मात्र ‘ऐका दाजीबा’नंतर ही जोडी परत एकत्र काही दिसली नाही. मिलिंद गुणाजी हे कलाविश्वामध्ये आजही सक्रिय आहेत. मात्र इशिता कुठे गेले, सध्या काय करते हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इशिता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री,गायिका इला अरुण यांची लेक असून ऐका दाजीबामुळे ती प्रकाशझोतात आली. खरं तर इशिताची नाळ लहानपणापासून कलाविश्वाशी जोडीली गेली आहे. लहान असताना इशिताने व्हीक्स कफ ड्रॉप्सची जाहिरात केली केली. तसंच शाळेत शिकत असताना तिने नादिरा बब्बर यांच्या अॅक्टींग वर्कशॉपमध्ये अभिनयाचे धडेदेखील गिरवले होते. इशिताने सें.झेविअर्स कॉलेजमधून तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे.

२००५ साली इशिताने ध्रुव घाणेकरसोबत लग्न केलं. ध्रुव घाणेकर हा बॉलिवूड गायक असून त्याने शास्त्रीय आणि जॅझ या प्रकाराही अनेक कार्यक्रम केले आहेत. ध्रुव घाणेकर हा दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. गिरीश घाणेकर यांनी ‘वाजवा रे वाजवा’, रंगत संगत’, ‘नवसाचं पोर’ सारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांची ‘गोट्या’ ही मालिका देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dajiba girl ishita arun see her photos ssj