टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देणारा नीरज स्टार झाला आहे. तो अनेक मुलींच्या गळ्यातील ताईत झाला असून ‘नॅशनल क्रश’ ठरला आहे. नुकताच नीरजने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी डान्स शो ‘डान्स प्लस ६’मध्ये हजेरी लावली. दरम्यान त्याला ‘लग्नासाठी कशी मुलगी हवी’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नीरजने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डान्स प्लस ६’ या शोचा सूत्रसंचालक राघव जुयालने नीरजीशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्याने नीरजला खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले. राघवने गुगलवर नीरज विषयी सर्च होत असलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. दरम्यान पुनीत पाठकने सर्व मुलींच्या वतिने नीरजा प्रश्न विचारला की ‘लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे?’ त्यावर राघवन ‘भाल्या सारखी हवी आहे’ असे म्हटले. ते ऐकून नीरज हसत म्हणाला, ‘नाही नाही, तिची उंची खूप होईल म. इतकी उंच नको.’

पुढे नीरजने त्याला कशी मुलगी हवी हे सांगितले आहे. ‘आता तर मी इतकच सांगेन की मी एक खेळाडू आहे आणि ती पण एक खेळाडू असावी. एकमेकांच्या कामाचा आदर करणारी असावी आणि हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तिने माझ्या कुटुंबीयांचा देखील आदर करायला हवा. माझ्यासाठी या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत’ असे नीरज म्हणाला.

त्यानंतर नीरजला इंटरनेटवर अनेकजण त्याचा नंबर सर्च करत असल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देत नीरज म्हणाला, ‘जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा काकांनी त्यांचा नंबर मला दिला. माझ्याकडे आजही तोच नंबर आहे. मला मेसेज करणाऱ्या प्रत्येकाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता ते शक्य नाही. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी एक वर्ष मी फोन बंद केला. तो अद्याप सुरु केलेला नाही.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance plus 6 neeraj chopra reveals about his dream life partner and phone number avb