बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोरा फतेहीला बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर म्हणून ओळखले जाते. तिला डान्सव्यतिरिक्त ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठीही ओळखले जाते. नुकतंच नोरा फतेहीचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नोरा ही चक्क लावणी करताना दिसत आहे.

सध्या नोरा फतेही ही डान्स दिवाने जूनियर या शोचे परिक्षक म्हणून काम करत आहे. यादरम्यान नोरा फतेहीने स्वत:चा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात नोरा ही ‘सात संमदर पार’ या गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. यात ती गीत कौर बग्गा आणि कॅप्टन सोनाली कार या दोघींसोबत स्टेजवर लावणी करत आहेत.

tharala tar mag fame Jui Gadkari Education
‘ठरलं तर मग’ फेम सायलीचं शिक्षण माहितीये का? मिळवलंय Gold Medal; उच्चशिक्षित जुई अभिनयाकडे कशी वळली?
Prithvik Pratap Funny Video
“सासू-सून महायुती…”, नवीन लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला घासावी…
Maharashtra Assembly Election 2024 Tejaswini Pandit Post for raj thackeray
“महाराष्ट्र हरलास तू…”, विधानसभेच्या निकालानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट; म्हणाली, “राजसाहेब…”
Chunky Pande And Bhavna Pande
वडिलांचा विरोध पत्करत केले प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न; खुलासा करत पत्नी म्हणाली, “मला असुरक्षित…”
majhi tujhi reshimgath fame swati deval play new role in Laxmi Niwas Serial
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री झळकणार ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत, पोस्ट करत म्हणाली…
Savlyachi Janu Savli
तिलोत्तमाने सावलीचा गृहप्रवेश नाकारला आणि प्रेक्षक भडकले; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “एवढी तरी लाज वाटू द्या…”
paresh rawal reacts on sanjay raut allegations maharashtra assembly election
“संजय उगाच च…”, परेश रावल यांची मोजक्या शब्दांची पोस्ट चर्चेत; संजय राऊतांना टोला? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Kinshuk Vaidya Wedding
‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू अडकला लग्नबंधनात, किंशुक वैद्यचं मराठी रितीरिवाजानुसार झालं लग्न; फोटो आले समोर

नोरा फतेहीने या दृश्याच्या पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा फतेहीने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “माझ्या ज्युनियर्ससोबत स्टेजवर डान्स करताना खूप मजा आली. यावेळी मी लावणीचा प्रयत्न केला. सोनाली आणि गीत या दोघीही अप्रतिम डान्सर आहेत. या व्हिडीओच्या मागेच तुम्ही जी कमेंट्री एकत आहात, ती देखील मला फार आवडली.”

नोरा फतेहीने ‘सात समंदर पार’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले. हे गाणे उदित नारायण आणि साधना सरगम ​​यांनी गायले आहे. हे गाणे ‘विश्वात्मा’ चित्रपटातील आहे. या गाण्याच्या मूळ ट्रॅकमध्ये दिव्या भारती दिसली होती. दरम्यान नोरा ही शेवटची ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच ‘थँक गॉड’ आणि ‘हरी वीरा मल्लू’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे.