प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणाऱ्या गौतमीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. नुकताच तिचा शिरूरमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तिचे चाहते बेभान होऊ नाचत होते. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी अनेकजण करत आहेत. यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमी झी २४ तासला आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली, “आज प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे, माझा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक लांबून येतात. या गोष्टीचा मला आनंद होतो. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मी फक्त एवढंच सांगेन की माझा अश्लीलपणा दाखवा आणि मग माझ्या कार्यक्रमांवर बंदी घाला,” सपना चौधरीशी तुझी तुलना होतेय यावर ती म्हणाली, “प्रेक्षक प्रेम दाखवत आहेत. मला छान वाटतंय ताईबरोबर माझं नाव जोडलं जात आहे.”

मराठी चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान यावर स्वप्नील जोशीची प्रतिक्रिया, म्हणाला….

गौतमीच्या एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडून तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. अवघ्या ५०० रुपयांच्या मानधनावर सुरु झालेला गौतमीचा प्रवास आज लाखो रुपयांचा व्यवसाय ठरला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancer gautami patil open up about her comparison with sapna chaudhary spg