गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. गौतमी पाटीलच्या लावणीचा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात चर्चेतील नाव गौतमी पाटील ठरलं होतं. काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीत गौतमीने तिच्या आयुष्यातील भावी जोडीदाराबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर आता गौतमीने लग्न कधी करणार यावर उत्तर दिले आहे.

गौतमी पाटीलने नुकतंच ‘ई-टीव्ही’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्यावर होणाऱ्या विविध आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी गौतमीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने लाजत लाजत उत्तर दिले.
आणखी वाचा : “तुमच्या ठुमक्यांवर लाखो फिदा, पण लग्नाला…” शेतकरी मुलाचं गौतमी पाटीलला पत्र

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Who is PV Sindhu Husband Venkat Datta Sai Education IPL Delhi Capitals Wedding
PV Sindhu Wedding: कोण आहे पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई? आयटी व्यावसायिक ते ‘या’ IPL संघाशी आहे कनेक्शन

“काही दिवसांपूर्वी तुम्ही एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलला होतात. अनेक तरुणांना तुम्ही लग्न कधी करणार आहात, असा प्रश्न पडला आहे?” असे तिला विचारण्यात आले.

त्यावर गौतमीने “अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगेन. सर्वांना पत्रिकाही देईन”, असे म्हटले. त्याबरोबरच तिने “तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा”, असेही चाहत्यांना सांगितले.

आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

दरम्यान काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलला लग्नावरुन बीडमध्ये राहणाऱ्या किसानपुत्र श्रीकांत गडालेंनी पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी गौतमी पाटीलची चांगलीच कानउघडणी केली होती. ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही’, असं म्हणत त्यांनी गौतमीला टोला लगावला होता.

Story img Loader