नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांचे पीक आले असताना या शोमधून सादरीकरण करत असताना स्पर्धकांना होणाऱ्या दुखापतींची गोष्ट आजवर पडद्याआडच राहिली आहे. ‘टु मॅड’ या मराठी नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाच्या अंतिम फेरीच्या चित्रीकरणादरम्यान एका स्पर्धकाला नृत्यातील एका प्रसंगात अपघाताला सामोरे जावे लागले. मुळातच नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमात स्पर्धकांना होणाऱ्या प्राथमिक इजांकडे लक्ष न दिल्यास नंतर त्या इजा त्यांना अधिकाधिक त्रास देण्याची चिन्हे असतात. मग अशा वेळेस कार्यक्रम निर्माण करणारी निर्मिती संस्था, तेथील तंत्रज्ञ आणि नृत्यदिग्दर्शक या सगळ्यांकडून स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी आणि आपले सादरीकरण उत्तम करण्यासाठी स्पर्धक सध्या आपल्या सुरक्षिततेचा विचार न करता नृत्यदिग्दर्शक अथवा कार्यक्रमाच्या सर्जनशील दिग्दर्शकाला हवं तसं करण्यास तयार होतात. नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांच्या संकल्पनेकडे लक्ष दिल्यास प्रत्येक आठवडय़ाला नृत्याच्या वेगवेगळ्या शैली वापरून सादरीकरण करण्याचा दबाव हा स्पर्धकांप्रमाणेच त्यांच्या नृत्यदिग्दर्शकावरही असतो. कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी निर्मिती संस्थेतील दिग्दर्शक नकळतपणे सादरीकरणाला प्राधान्य देताना सुरक्षिततेला दुय्यम स्थान देतात. सध्याच्या नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमामध्ये हमखास दिसणारा आणि नव्याने उदयास आलेला प्रकार म्हणजे ‘एरियल अॅक्ट’. यामध्ये स्पर्धकाला गोल अथवा निरनिराळ्या भूमितीय आकाराचे िरग अथवा कमरेला दोऱ्या लावल्या जातात. किंवा ‘सिल्क’सारखे कापड अंगाला गुंडाळून हवेत झुलत नृत्यमुद्रा करत सादरीकरण करायचे असते. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमाचा विजेता माणिक पॉल हा यांसारख्या ‘एरियल अॅक्ट’साठी प्रसिद्ध आहे. आपल्या सर्जनशील आणि डौलदार ‘एरियल अॅक्ट’मुळेच त्याने कार्यक्रमाचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. मात्र अशाप्रकारच्या सादरीकरणावेळी सुरक्षित साधनांची आवश्यकताही गरजेची असते. बऱ्याच वेळा स्पर्धक ‘एरियल अॅक्ट’सारख्या सादरीकरणात तरबेज असतानाही केवळ उत्साहापोटी वेगळे काही करताना जखमी होतात, हे आपण नृत्यविषयक कार्यक्रमांमध्ये पाहतो. सतत काहीतरी वेगळे करण्याच्या नादात स्पर्धक आणि नृत्यदिग्दर्शक त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे कानाडोळा करतात.
कित्येकदा असे धोकादायक सादरीकरण पाहताना परीक्षकांचाही थरकाप उडतो. आपल्या साडीच्या पदराआडून असे सादरीकरण पाहणाऱ्या किरण खेरसारख्या परीक्षकोंच्या चेहऱ्यावरचे हावभाव अशावेळी खूप काही बोलून जातात. याशिवाय कित्येक वेळा अती झालेल्या तालमींमुळेही स्पर्धकांच्या शरीराला इजा होते आणि स्पध्रेत टिकून राहण्यासाठी दुखापत तशीच ठेवून स्पर्धक आपले सादरीकरण करतो. या सगळ्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागते. याशिवाय नृत्यात बऱ्याच अशा शैली आहेत जिथे सादरीकरणापूर्वी तुम्हाला तुमचे शरीर व्यायामाद्वारे मोकळे करावे लागते. ज्याला नृत्याच्या भाषेत ‘स्ट्रेचिंग’ असे म्हणतात. तसे न केल्यास शरीराची त्वचा फाटण्याची शक्यता असते. ‘क न्टेम्परी’, ‘बॅले’ यांसारख्या नृत्यशैलीत नाचण्यासाठी सुरुवातीला किमान १५ ते २० मिनिटे व्यायामाची नितांत गरज असते. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या स्पध्रेत अंतिम पात्रता फेरीत आपले सादरीकरण करताना बॅले नर्तक ओमकार गोताड याची त्वचा ताणून फाटली होती. चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करायचे असल्याने ओमकारला त्यावेळेस व्यायाम करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नव्हता आणि त्यांनतरही चार दिवस पुढे सातत्याने चित्रीकरण असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याला पुढील काही महिने मोठय़ा उपचारांना सामोरे जावे लागले. तसेच याच कार्यक्रमात अंतिम फेरीत सहभागी असणाऱ्या स्वप्निल नगरकर या स्पर्धकाला देखील जोशपूर्ण सादरीकरणाच्या तालमीमुळे पायाला दुखापत झाली होती. िहदीमधील नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये अशी इजा होण्याची प्रकरणे सातत्याने आपल्याला दिसतात, पण अजूनही त्याबद्दल ना वाहिन्या, ना नृत्यदिग्दर्शक, ना स्वत: स्पर्धक पुरेशा गांभीर्याने विचार करताना दिसतात.
सुरुवातीला एरियल अॅक्टचे प्रशिक्षण नवख्या विद्यार्थ्यांना देत असताना सुरक्षेचा मुद्दा माझ्याकडून हाताळला जातो. कारण पालक माझ्यावर विश्वास ठेवूनच मुलांना असा नृत्याचा थोडा धोकादायक प्रकार माझ्याकडे शिकवण्यासाठी पाठवत असतात. जिथे मुले सातत्याने हवेत झुलत असतात त्यामुळे अशावेळेला खाली मऊ चटई (मॅट) अंथरुण त्यानंतर मी मुलांचा सराव सुरू करतो. याशिवाय मोठय़ा कार्यक्रमात किंवा रिअॅलिटी शोसाठी अशा एरियल अॅक्ट दिग्दíशत करण्याची वेळ आल्यास मी निर्मिती संस्थेला सुरक्षित साधनांचा पुरवठा करण्याची मागणी करतो. जर स्पर्धकामध्ये एरियल अॅक्टला सामोरे जाण्याएवढा आत्मविश्वास नसेल तर तालीम करताना खाली मॅट लावून स्पर्धकामध्ये विश्वास आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. समजा तसे न झाल्यास चित्रीकरणावेळी आम्ही खाली मॅट अंथरतो. मात्र बऱ्याच वेळा स्पर्धक हे आत्मविश्वासाने, तयारीने एरियल अॅक्टला सामोरे जातात.
माणिक पॉल, एरियल अॅक्ट नृत्यदिग्दर्शक
रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मी एवढेच सांगू इच्छितो की त्यांनी अंत्यत शांतपणे आपले सादरीकरण करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा स्पर्धक अतिउत्साहात आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. मीही त्यावेळी अतिउत्साहात अति तालीम केल्याने मला इजेला सामोरे जावे लागले होते. तसेच कित्येकदा निर्मिती संस्थाही स्पर्धकांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळाच करतात. त्यांना केवळ आपला टीआरपी वाढवायचा असतो. त्यामुळे स्पर्धकांना धोकादायक सादरीकरण करण्यासाठी सांगितले जाते.
– स्वप्निल नगरकर, स्पर्धक, डान्स महाराष्ट्र डान्स