सारा अली खान, जान्हवी कपून, सुरज पांचोली, आथिया शेट्टी, आलिया भट्ट, वरून धवन, टायगर यांच्यापाठोपाठ आणखी एक स्टार किड्सच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. बॉलिवूडचे प्रसिध्द खलनायक डॅनी डेन्झोप्पा यांचा मुलगा रिनजिंग बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘स्क्वॉड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याच्या चित्रीकरणास एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘स्क्वॉड’ हा चित्रपट एका अॅक्शनपट आहे.

स्क्वॉड या चित्रटाचं दिग्दर्शन कोण करणार? आणि या चित्रपटाची नायिका कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण चित्रपटातील इतर कलाकार कोण असणार याची अधिकृत घोषणा लकरच होईल, असं रिनजिंग म्हणाला. तर डॅनी यांनीही आपल्या पुत्राच्या बॉलिवूड पदार्पणाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

आमच्या कुटुंबीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आता रिनजिंगला खूप मेहनत करायची आहे. त्याचा आगामी चित्रपट अॅक्शन थ्रिलर असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं डॅनी म्हणाले.

Story img Loader