आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या दमदार ट्रेलरला मोठी पसंती मिळताना दिसतेय. नुकताच या ट्रेलरचा लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला सिनेमाच्या टीमने हजेरी लावली होती. तर गरोदर असल्याची बातमी दिल्यानंतर आलिया देखील पहिल्यांदाच मीडियासमोर आली.

आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. दरम्यान आलिया तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमासाठी परदेशात होती. काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर आलिया ‘डार्लिंग्स’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्यानिमित्ताने पहिल्यांदा थेट चाहत्यांच्या समोर आली आहे. या सोहळ्यात आलिया नेहमी प्रमाणेच ग्लॅमरस दिसत होती. मात्र बेबी बंप लपविण्यासाठी तिने खास ड्रेसची निवड केली होती हे तिचा लूक पाहता लक्षता येतंय.

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ

हे देखील वाचा: रणवीर सिंगनंतर ‘या’ अभिनेत्रीचं न्यूड फोटोशूट चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

‘डार्लिंग’च्या ट्रेलर लॉन्चला आलियाने पिवळ्या रंगाचा टेन्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमधील काही फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले आहेत. हा ड्रेस शॉर्ट असला तरी ढगळा असल्याने ड्रेसमध्ये आलियाचं बेबी बंप दिसत नाहिय. तर या पिवळ्या ड्रेससोबत तिने अगदी साधा मेकअप केल्याचं दिसून येतंय. कमी मेकअप आणि या पिवळ्या ड्रेसमध्येही आलियाचं सौंदर्य खुलून आलंय.


‘डार्लिंग्स’ हा डार्क कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमामध्ये आलिया भट्टसोबत अभिनेत्री शेफाली शहा तसचं अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. निर्माती म्हणून आलियाचा हा पहिला सिनेमा आहे.

Story img Loader