सिनेरसिकांना करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजय देवगणच्या ‘शिवाय’ सिनेमाकडून फार अपेक्षा होत्या. ऐ दिलमध्ये ऐश्वर्या राय- बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. तर ‘शिवाय’ सिनेमात सगळ्याच पातळींवर अजय देवगणच सर्वेसर्वा आहे. हे सिनेमे प्रदर्शित होण्यापूर्वी यातला एखादा सिनेमा तरी बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल असे वाटत होते. पण सध्या तसे होताना मात्र दिसत नाही. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दोन्ही सिनेमे अजून पाहिजे तशी कमाई करु शकले नाहीत.

 

‘ऐ दिल है मुश्किल’च्या कलेक्शनबद्दल विचार करु तर पहिल्या दिवशी या सिनेमाने चांगला गल्ला कमावला होता. १३.३० कोटी रुपयांची कमाई केली होती. चौथ्या दिवसापर्यंत या सिनेमाने चांगली कमाई केली होती. चौथ्या दिवशी या सिनेमाने १७.७५ कोटी रुपये कमावले होते. पण त्यानंतर मात्र दिवसागणित या सिनेमाची कमाई कमीच होत गेली. सातव्या दिवशी या सिनेमाने फक्त ६.१८ कोटींची कमाई केली. नवव्या दिवशी या सिनेमाने फक्त ५.८६ कोटींचीच कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने एकूण ९०.६० कोटींची कमाई केली आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ची आतापर्यंतची कमाईः

पहिला दिवसः १३.३० कोटी

दुसरा दिवसः १३.१० कोटी

तिसरा दिवसः ०९.२० कोटी

चौथा दिवसः १७.७५ कोटी

पाचवा दिवसः १३.०३ कोटी

सहावा दिवसः ०७.६३ कोटी

सातवा दिवसः ०६. १८ कोटी

आठवा दिवसः ४.५६ कोटी

नववा दिवसः ५.८५ कोटी

एकूण- ९०.६० कोटी

‘शिवाय’ सिनेमाच्या पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसांपर्यंत हे कलेक्शनचे आकडे पाहिले तर पहिल्या दिवशी १०.२४ कोटी, दुसऱ्या दिवशी १०.६ कोटी, तिसऱ्या दिवशी ८.२६ कोटी, चौथ्या दिवशी १७.३५ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.५ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. आठव्या दिवशी या सिनेमाने पाहिजे तशी कमाई केली नाही. त्यादिवशी फक्त ०४.६१ कोटी एवढीच कमाई या सिनेमाला करता आली. तर नवव्या दिवशीही हा सिनेमा कासवाच्या गतीने कमाई करताना दिसला.

सिनेमाच्या तिसऱ्या दिवसापासून ‘शिवाय’च्या कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसली. आताही सिंगल स्क्रिन चित्रपटगृहात ‘शिवाय’ सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. जर ‘शिवाय’ बॉक्स ऑफिसवर अशीच कमाई करत राहीला तर काहीच दिवसात तो ‘ऐ दिल हा मुश्किल’ सिनेमाला सहज मागे टाकेल.

‘शिवाय’ची आतापर्यंतची कमाईः

पहिला दिवसः १०.२४ कोटी

दुसरा दिवसः १०.६ कोटी

तिसरा दिवसः ८.२६ कोटी

चौथा दिवसः १७.३५ कोटी

पाचवा दिवसः ११.५ कोटी

सहावा दिवसः ०७.४० कोटी

सातवा दिवसः ०६. ०२ कोटी

आठवा दिवसः ०४.६१ कोटी

नववा दिवसः ०५.४० कोटी

एकूण- ८०.४२ कोटी

Story img Loader