बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांसाठी नावाजला जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ चित्रपटात अभिनेता अजन देवगन आणि तब्बू हे एकत्र पहायला मिळाले होते. त्यांचा हा चित्रपट आणि आमिर खान निर्मिती ‘सिक्रेट सुपरस्टार’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. परंतु ‘गोलमाल अगेन’ने आमिरला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर राज्य केले होते.
आता अजय देवगण आणि तब्बू ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. तसेच हा चित्रपट अकिव अली दिग्दर्शीत करणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय आणि तब्बूसोबत राकूल प्रित सिंगदेखील चित्रपटात झळकणार आहे. या जोडीला पुन्हा एकदा सोनेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
Ajay Devgn, Tabu and Rakul Preet Singh… First look poster of #DeDePyaarDe… Directed by Akiv Ali… Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Luv Ranjan and Ankur Garg… 17 May 2019 release. #DeDePyaarDeFirstLook pic.twitter.com/Qc2ytegNUW
— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2019
‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगनला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. आता अजय एस. एस. राजामौलींच्या ‘RRR’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील असणार आहे. राजामौलींचा हा चित्रपट ३० जुलै २०२०ला प्रदर्शित होणार असून तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक होणार आहे.