२००८मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट तुम्हाला आजही आठवत असणारच. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने या चित्रपटामध्ये कमाल केली. आता हीच धमाल प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. ‘दे धक्का’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्याचपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये चित्रपटामधील कलाकारांचा लूक पाहायला मिळत आहे. तसेच एका नव्या अभिनेत्रीची देखील या चित्रपटामध्ये एण्ट्री झाली आहे.

आणखी वाचा – VIDEO : लंडनमध्ये रंगला सोनम कपूरचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, धम्माल सेलिब्रेशन अन् गाण्यांची मैफिल

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Punha Kartvya Aahe
Video: वंदना गुप्तेंचा रूद्रावतार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील पहिली झलक आली समोर, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”
Bigg Boss Marathi Fame sonali patil dance on mala lagali kunachi uchaki song
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, हातात काठी घेऊन ऊसाच्या फडात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा डान्स, पाहा व्हिडीओ
Paaru
Video : “कोणाची नियत…”, अनुष्का करणार पारूविरुद्ध कारस्थान; आदित्य तिला कसे वाचवणार? मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो….

‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय…’ म्हणत अभिनेता सिद्धार्थ जाधवने या चित्रपटाचा टीझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या टीझरमध्ये चित्रपटामधील पात्र मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसना पाहायला मिळत आहे. सायली हे पात्र अभिनेत्री गौरी इंगवले साकारणार आहे. गौरीची या चित्रपटामध्ये नव्याने एण्ट्री झाली आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये काळी-पिवळी टॅक्सी नव्हे तर कार दिसत आहे. शिवाय चित्रपटाच्या दुसऱ्या भागात जाधव कुटुंबियांची लंडन वारी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

आणखी वाचा – सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप, तरीही अक्षयने घेतला मोठा निर्णय, आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ला देणार टक्कर

येत्या ५ ऑगस्टला ‘दे धक्का २’ चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि तिथपासूनच चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता चित्रपटाच्या नव्या भागामध्ये काय पाहायला मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader