सध्या सगळीकडेच दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा आमदार राणे यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाले, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा : अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधीही गुजरात आणि हरियाणा येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Declare the kashmir files tax free in maharashtra bjp mla nitesh rane writes to cm uddhav thackeray dcp