‘हैदर’ चित्रपटात शाहिद कपूरने ‘हैदर’ची मुख्य भूमिका उत्तमरित्या साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनी ‘हैदर’मधील त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली. ‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटासाठी तो कमालीची मेहनत घेत आहे. रात्रभराच्या शुटिंगनंतर, पहाटे जीममध्ये जाऊन तो व्यायाम करतो. ट्रेडमीलवर चालण्याचा व्यायाम करतानाचे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पंजाबमधील थकविणाऱ्या रणरणत्या उन्हात पार पडत असलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो सज्ज झाला असून, चित्रीकरणाच्या स्थळावरील छायाचित्रदेखील त्याने सोशल मीडियावर झळकविले आहे. चित्रपटात शाहिद कपूरबरोबर करिना कपूर खान, आलिया भट आणि पंजाबी अभिनेता दलजित दोसांझ यांच्यादेखील भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2015 रोजी प्रकाशित
कामाप्रती समर्पित शाहिद रात्रभराच्या शुटिंगनंतर पहाटे करतो ‘वर्कआऊट’
'हैदर' चित्रपटात शाहिद कपूरने 'हैदर'ची मुख्य भूमिका उत्तमरित्या साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली.
First published on: 21-04-2015 at 03:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dedicated shahid kapoor works out early morning after all night shoot