‘हैदर’ चित्रपटात शाहिद कपूरने ‘हैदर’ची मुख्य भूमिका उत्तमरित्या साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनी ‘हैदर’मधील त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली. ‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटासाठी तो कमालीची मेहनत घेत आहे. रात्रभराच्या शुटिंगनंतर, पहाटे जीममध्ये जाऊन तो व्यायाम करतो. ट्रेडमीलवर चालण्याचा व्यायाम करतानाचे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पंजाबमधील थकविणाऱ्या रणरणत्या उन्हात पार पडत असलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो सज्ज झाला असून, चित्रीकरणाच्या स्थळावरील छायाचित्रदेखील त्याने सोशल मीडियावर झळकविले आहे. चित्रपटात शाहिद कपूरबरोबर करिना कपूर खान, आलिया भट आणि पंजाबी अभिनेता दलजित दोसांझ यांच्यादेखील भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा