शिंदे गटात जाण्यासाठी अद्यापही वेटींगवर असणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दीपाली सय्यद यांनी आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाधून बोगस लग्न लावली आहेत. दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय्य सहाय्यक यांनी हा आरोप केला आहे.

भाऊसाहेब शिंदे असे माजी स्वीय्य सहाय्यकाचे नाव आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं की, “दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सय्यद यांनी हजारो कोटी रुपयांचं वाटप केलं. पण, ऑडिट रिपोर्ट मिळाल्यावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटमध्ये फक्त ९ हजार १८२ रुपये आढळून आले. मग बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कोठून दिली आणि कोठून आणली, याची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी. चौकशी झाली नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासमोर आत्मदहन करणार,” असा इशारा शिंदेंनी दिला.

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

“दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ९-९-२०२१ साली सांगलीत बोगस लग्न लावण्यात आली. २०१६ रोजी एका दाम्पत्याचे लग्न झालं होतं. त्यांना २०१८ साली अपत्य झालं. पण, त्यांचा विवाह दीपाली सय्यद आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा २०२१ साली लावला. बोगस कामांसाठी राज्यपाल कोश्यारी दीपाली सय्यद यांना सहकार्य करतात. दीपाली सय्यद यांच्यावर राज्यपाल का मेहेरबान आहेत, याची चौकशी राज्य शासनाने करावी,” अशी मागणीही भाऊसाहेब शिंदे यांनी केली.

तर, भाऊसाहेब शिंदे यांनी केलेले सर्व आरोप दीपाली सय्यद यांनी फेटाळले आहेत. ‘एबीपी माझा’शी बोलताना सय्यद यांनी सांगितलं, “माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर झालेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांना माझ्या नावावर पैसे घेताना मी पकडलं आहे. त्यामुळे मी त्यांना ट्रस्टवरून बाजूला केलं. हाच राग मनात धरून माझ्यावर आरोप करण्यात आले. मी याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार,” असे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं.