सध्या बी टाऊन आणि मीडियामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याच लग्नाची चर्चा आहे. लग्न कुठे होणार इथपासून ते पोषाख, मेन्यू, संगीत काय असेल याबद्दल रोजच्या रोज वेगवेगळया बातम्या प्रसिद्ध होत आहेत. चाहते देखील आपल्या या आवडत्या कलाकारांविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तितकेच उत्सुक आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार दीपिका आणि रणवीर डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इटलीमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाआधीचे विधी आणि अन्य कार्यक्रम सुरु झाले आहेत. दीपिका नुकतीच नंदी पूजेसाठी बंगळुरुला तिच्या घरी गेली होती. १४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे.

१५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होईल. रणवीर सिंग सिंधी आहे. १६ तारखेला सर्व पाहुणे मायदेशी परततील. दीपिका-रणवीर कुठला पोषाख परिधान करणार ? काय दागिने घालणार ? ते आधीच ठरले आहे. मागच्या महिन्यात ऑक्टोंबरमध्ये त्यांनी टि्वटरवरुन लग्नाची घोषणा केली. तेव्हापासून प्रसारमाध्यमांचे दोघांवर बारीक लक्ष आहे. त्यावेळी त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग करण्याबद्दल कुठलीही माहिती दिली नव्हती. इटलीत लेक कोमो येथे दोघ लग्न करतील अशी चर्चा होती. बॉलिवूडमधल्या आपल्या मित्र परिवारासाठी दोघांकडून एक डिसेंबरला मुंबईत भव्य स्वागतसोहळा आयोजित केला जाईल अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika and ranveer to have sindhi and konkani weddings