‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये फारशी दिसलेली नाही. काही ठराविक मालिका वगळता दीपिका अभिनय क्षेत्रापासून दूर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान हे दोघंही त्यांच्या युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. याशिवाय हे दोघंही सोशल मीडियावरही वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. पण नुकत्याच शेअर केलेल्या काही फोटोंमुळे मात्र शोएब आणि दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

दीपिका आणि शोएब यांनी नुकतीच अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली. याचे काही फोटो शोएबने त्याच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. ज्यात दीपिकानं असे कपडे परिधान केले आहेत ज्यात तिचा पूर्ण चेहरा झाकला गेला आहे. दीपिका- शोएबचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. त्यांच्या चाहते या फोटोंवरून त्यांचं कौतुक करताना दिसत असले तरी काही युजर्स मात्र या दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर काहींनी दीपिकाच्या दर्गा दर्शनावर आक्षेप घेतला आहे.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
rinku rajguru Krishnaraaj Dhananjay Mahadik photo from Mahalaxmi Temple Kolhapur
कृष्णराज महाडिक व रिंकू राजगुरूच्या कोल्हापुरातील फोटोची चर्चा, नेटकरी म्हणाले, “सैराट झालं जी…”
why asha bhosle and lata mangeshkar always wore white saree
मी आणि दीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो कारण…; आशा भोसलेंनी सांगितली आठवण, म्हणाल्या, “रंगीत साड्या नेसल्या तर…”
Milind Gawali
मिलिंद गवळी यांनी १०३ वर्षे जुन्या ‘या’ वास्तूला दिली भेट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “वेगळ्या विश्वात…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”

शोएबनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘जसं की आपल्याला माहीत आहे. दीपिकानं इस्लामचा स्वीकार केला आहे. ती शोएबसाठी काहीही करायला तयार आहे. पण शोएब तिच्यासाठी कधी मंदिरात जात नाही. तुम्ही दोघंही एकत्र खूप छान दिसता. आम्ही सर्व तुमच्यावर प्रेमही करतो. पण शोएब तू कधी दीपिकासोबत मंदिरात जा. तिलाही आनंद होईल.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी अशाप्रकारच्या कमेंट करत दीपिका आणि शोएबला अजमेर शरीफ जाण्यावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान दीपिका आणि शोएब अशाप्रकारे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बऱ्याच वेळा या दोघांना वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल करण्यात आलं आहे. पण या दोघींनी आता अशा गोष्टींकडे लक्ष देणं बंद केलं आहे. अगदी सुरुवातीला दीपिका कक्करनं जेव्हा धर्म परिवर्तन केल्याचं मान्य केलं होतं त्यावेळीही तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

Story img Loader