बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. नुकताच दीपिकाने एक विनोदी व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत दीपिकाने तिच्या हेअर स्टायलिस्ट सोबत प्रँक केल्याचं पाहायला मिळतंय. दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय.

दीपिकाने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात दीपिकाने तिच्या हेअर ड्रेसरला तिखट-मीठ लावलेली कच्ची कैरी खायला दिल्याचं पाहायला मिळतंय. यात आपण पाहू शकतो की दीपिकाचा हेअर ड्रेसर यीयानी हा भारतीय नसून विदेशी आहे. त्यामुळे ही तिखट कैरी खाल्यानंतर यीयानीचा चेहरा चांगलाच लालबूंद झाला आहे. यीयानी या तिखट कैरीचा फक्त एक तुकडा तोंडात टाकतो त्यानंतर त्याचा चेहरा पाहण्यासारखा आहे. यावर दीपिका त्याची मस्करी करत त्याला विचारते “काय झालं यीयानी (Yianni Tsapatori)” यावर तिखड कैरी खाऊन डोळ्यात पाणी आलेला यीयानी म्हणतो, “माझ्या तोंड्याची आग होतेय. तुला हे का आवडतं?”

तर कैरी खावून हेअर ड्रेसर यीयानीची अवस्था पाहून दीपिकाला मात्र हसू आवरणं कठीण झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय. हा विनोदी व्हिडीओ दिपीकाने शेअर केलाय. दीपिकाच्या या धमाल व्हिडीओला अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय.

दीपिका सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करतेय. लवकरच ती शकुन बत्राच्या सिनेमात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे. तसचं ती शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत ‘पठाण’ सिनेमाक प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याचसोबत प्रभाससोबतही ती एका सिनेमावर काम करत आहे.

Story img Loader