आजकाल बॉलिवूडचे अनेक सेलिब्रीटी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. या सेलिब्रीटींचे कोट्यावधी फॉलोअर्स असतात. त्यामुळे सेलिब्रीटींच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स आणि कमेंट असतात. परंतु नुकताच समोर आलेल्या एका अहवालानूसार बॉलिवूडमधील काही सेलिब्रीटींचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोवर्स फेक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटच्या फेक फॉलोअर्सच्या यादीमध्ये बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांचा टॉप १० सेलिब्रीटींमध्ये समावेश आहे. या रिपोर्टनुसार भारतीय अभिनेत्रींपैकी दीपिका आणि प्रियांका यांचे सर्वात जास्त फेक फॉलोअर्स आहेत.

जगभरातील अनेक सेलिब्रीटींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फेक फॉलोअर्स असल्याचे इंस्टीट्यूट ऑफ कंटेपररी म्यूजिक परफॉरन्स (ICMP) ने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. या यादीमध्ये दीपिका पदूकोण ६व्या क्रमांकावर आहे तर प्रियांका चोप्रा १०व्या क्रमांकावर आहे. या रिपोर्टसनुसार दीपिकाचे ४५ टक्के म्हणजेच १३ कोटी फॉलोअर्समधीस जवळजवळ ६ कोटी फॉलोअर्स फेक आहेत. तर प्रियांकाचे ४३ टक्के म्हणजे ४ कोटी फॉलोअर्स फेक असल्याचे सांगितले आहे.

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर टॉक शो होस्ट एलेन डीजेनेरेस आहे. त्याचे ५८ टक्के फेक फॉलोअर्ल आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील बॉय-बॅन्ड बीटीएस यांचे ४८ टक्के फेक फॉलोअर्स आहेत. हे सेलिब्रीटी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टसाठी कोट्यावधी रुपये घेतात. प्रियांका चोप्रा तिच्या एक इन्स्टाग्राम पोस्टसाठी १ कोटी ८६ लाख ९५ हजार रुपये घेते. तर दीपिका एक पोस्टसाठी १ कोटी ३५ लाख रुपये घेते. या इन्स्टाग्रामच्या फेक फॉलोअर्स यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे देखील सहभागी आहे.