गेल्या आठवड्यात दीपिका-रणवीर विवाहबंधनात अडकले. नुकतीच बेंगळुरूमध्ये या दोघांची ग्रँड रिसेप्शन पार्टी पार पडली. मात्र या दोघांनी मुंबईत आणखी तीन पार्टीचं आयोजन केलं आहे. २४, २८ आणि १ डिसेंबर असे तीन दिवस मुंबईतल्या आलिशान हॉटेलमध्ये कुटुंबीय, विविध क्षेत्रातील नामांकित लोक आणि बॉलिवूडसाठी ही पार्टी आयोजीत करण्यात आली आहे.

२८ तारखेला रणवीरच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या ग्रँड हयातमध्ये ही पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी उपस्थित राहणाऱ्या मंडळीनां आहेर दीपिकाच्या स्वयंसेवी संस्थेला दान करावा असं सांगण्यात आलं आहे. तर १ डिसेंबरला बॉलिवूडसाठी पार्टी ठेवण्यात आली आहे. या पार्टीसाठी ड्रेस कोडही ठेवण्यात आला आहे. अमिताभ बच्चन, कतरिना, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा अशी अनेक मंडळी पार्टीसाठी उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.

मात्र २४ तारखेची पार्टी ही कोणासाठी आयोजित करण्यात आली आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. १४ नोव्हेंबरला कोंकणी तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमो परिसरात मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.