दीपिका-रणवीर हे दोघंही दोन आठवड्यापूर्वी विवाहबंधनात अडकले. मुंबईतील रिसेप्शन पार पडल्यानंतर दीपिका रणवीर गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. नवविवाहित जोडप्यानं आपल्या कुटुंबीयांसोबत बाप्पांचं दर्शन घेतलं.
इटलीतील लेक कोमो परिसरातील एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका आणि रणवीर दोघंही विवाहबंधनात अडकले. पारंपरिक कोकणी आणि सिंधी पद्धतीनं दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या जोडप्यानं नुकतंच मुंबईत जवळच्या मित्रपरिवारासाठी रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर गुरूवारी दीपिका रणवीरनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी दीपिकाची आई, वडील प्रकाश पादुकोन उपस्थित होते. रणवीरचे वडील जगजीत भवनानी आणि आईही दर्शनाला आले होते.
सुखी संसारासाठी दोघांनीही बाप्पांचे आशीर्वाद घेतले. प्रभादेवीमधल्या या प्रसिद्ध गणपती मंदिरात नवविवाहित जोडपं लग्नानंतर आवर्जून आशीर्वाद घेण्यासाठी येतात म्हणूनच दीप-वीरनंही लग्नानंतर मंदिरात उपस्थिती लावली. दरम्यान दीप-वीरला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. यापूर्वी ‘पद्मावत’ चित्रपटातील विघ्न दूर व्हावी यासाठी दीपिका रणवीरनं एकत्र सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं.