दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग हे दोघंही बॉलिवूडमधलं सध्याच्या घडीचं आवडतं जोडपं आहे. गेल्याच महिन्यात इटलीतल्या नयनरम्य परिसरात ते दोघंही मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले. या दोघांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली, सहा वर्षांपासून ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आणखी एक गुपित दोघांनीही त्यांच्या चाहत्यांपासून लपवून ठेवलं होतं. हे गुपित नुकतंच एका मुलाखतीत दीपिकानं  उघड केलं.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत  रणवीरशी चार वर्षांपूर्वीच साखरपुडा केला असल्याचं दीपिकानं मान्य केलं. २०१६ मध्ये पहिल्यांदा या दोघांनीहा साखरपुडा केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र या वृत्तावर दोघांनी मौन धारण करणं पसंत केलं होतं. आता मात्र सारखपुडा फार पूर्वीच झाला असल्याचं मान्य करून तिनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले. १४ नोव्हेंबरला पारंपरिक कोंकणी आणि १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं दोघांचा विवाहसोहळा पार पडला. इटलीटत लेक कोमो या नयनरम्य परिसरात हा विवाहसोहळा पार पडला होता. या सोहळ्यानंतर दोघांनी बंगळुरू आणि मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.

Story img Loader