जिवलग मैत्रिणीच्या लग्नासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण कॅनडाहून थेट श्रीलंकेला पोहोचली आणि विशेष म्हणजे या लग्नासाठी अभिनेता रणवीर सिंगही तिथे आला होता. या लग्नात हे दोघेही पुन्हा एकत्र दिसल्याने त्यांच्या फुलणाऱ्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली.
दीपिका सध्या तिच्या हॉलिवूडमधील पदार्पणाच्या चित्रपटासाठी कॅनडामध्ये शूटिंग करते आहे. पण जिवलग मैत्रिणीचे लग्न असल्यामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक घेत थेट श्रीलंकेला प्रयाण केले. या लग्नासाठी रणवीर सिंग आणि दीपिकाची आईही श्रीलंकेमध्ये आले होते. लग्नात रणवीर सिंग त्याचबरोबर दीपिका आणि तिची आई पाहुण्यांसोबत बोलतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. लग्नासाठी दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. फोटोनुसार ती लग्नात खूप आनंदी असल्याचे दिसते.
गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रणवीर टोरांटोला गेला होता. अचानकपणे दीपिकांच्या सेटवर जाऊन त्याने तिला आश्चर्याचा धक्काही दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या लग्नाच्या निमित्ताने हे दोघेजण एकत्र दिसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा