फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटासाठी अखेर हिरोइन सापडली आहे. चेन्नई एक्स्प्रेसच्या यशानंतर दीपिका पादुकोण आणि शाहरुखची जोडी पुन्हा एकदा ‘हॅपी न्यू इयर’साठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. दीपिकाने यावर्षी ‘रेस २’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ हे दोन यशस्वी चित्रपट केले असून ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुखसोबत तिची जोडी सुंदर दिसत होती. बहुतेक याच कारणांमुळे तिला फराहचा चित्रपट मिळाल्याची शक्यता आहे.
‘हॅपी न्यू इयर’साठी कतरिना, प्रियांका चोप्रा, टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची देखील नावे घेतली जात होती. यामध्ये दीपिकाने भूमिका पटकावून बाजी मारल्याचे दिसते. मात्र, याबाबत चित्रपटाची दिग्दर्शिका फराह खान आणि निर्माता शाहरुखने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शाहरुख म्हणाला की, मी चित्रपटात अभिषेक बच्चन आणि बूमन इराणी यांच्यासोबत काम करणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. पण, या नवीन चर्चेच्या तर्कवितर्कांबाबत बोलणे त्याने टाळले.
‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रिकरणास सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Story img Loader