‘हो मी स्त्री आहे. मला स्तन आहेत. तुम्हाला काही आक्षेप आहे का?’ असा थेट प्रश्न विचारुन प्रसार माध्यमांची कान उघाडणी करणा-या अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘माय चॉइस’ हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडिओ अनेक महिलांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
दीपिकाचा ब्लॉग: स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग हा बातमीचा विषय नाही
२ मिनिटे ३४ सेकंदाच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन दिग्दर्शक होमी अदजानियाने केले आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ बोलण्याची गोष्ट नसून ती तुमच्या कृतीतूनही दिसली पाहिजे हा या व्हिडिओमागचा उद्देश आहे. महिलांनाही स्वतंत्र जगण्याचा, स्वत:च्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. यावर व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. “मी एक स्त्री आहे. मला माझ्याशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असून, मी कोणते कपडे परिधान करावेत, विवाह करावा किंवा करू नये, किंवा विवाहाच्या आधी सेक्स करावा की करू नये, हे सर्वस्वी माझे निर्णय आहेत” असे म्हणताना दीपिका यात दिसते.
सदर व्हिडिओमध्ये तब्बल ९९ महिलांचा समावेश करण्यात आला असून यात फरहान अख्तरची पत्नी अधुना अख्तर, बहिण झोया आणि होमी अदजानियाची पत्नी अनायता यादेखील आहेत.
पाहाः दीपिका म्हणते, ‘इट इज माय चॉइस’
'हो मी स्त्री आहे. मला स्तन आहेत. तुम्हाला काही आक्षेप आहे का?' असा थेट प्रश्न विचारुन प्रसार माध्यमांची कान उघाडणी करणा-या अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'माय चॉइस' हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा
First published on: 30-03-2015 at 08:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone bats for women equality in new online video