‘ओम शांति ओम’ या चित्रपटाने २००७ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वर जात असून ५०० कोटी कमविणारी ती एकमेव अभिनेत्री ठरली आहे.
दीपिकाने तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीरसोबत चर्चेत असलेली अभिनेत्री कतरिनाला टक्कर दिली आहे. कतरिनाने २०१२ मध्ये ‘एक था टायगर’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटातून ३१९.६३ कोटी कमविले होते. तर दुस-या स्थानावर असलेल्या करिनाने २०११ साली ‘बॉडीगार्ड’ आणि ‘रा.वन’ चित्रपटाद्वारे २६३.१५ कोटी कमविले होते. या दोघींनाही मात देत दीपिकाने ‘रेस २’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या यशस्वी चित्रपटांद्वारे अंदाजे ५०० कोटींची कमाई केली आहे.
तसेच, संजय लीला भन्सालीचे रामलीला चित्रपटही तिच्याकडे आहे. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार असून दीपिका यंदा ५५० ते ६०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा