गेले काही दिवस बॉलीवूडची आघाडीची नायिका दीपका पादुकोण ही खूपच चर्चेत आहे. मात्र, यावेळी ती तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेल्या छायाचित्रामुळे. वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणावेळी घातलेल्या ड्रेसमुळे दीपिका चर्चेत आली आहे.
वादग्रस्त ट्विटविरोधात दीपिकाचा रुद्रावतार
वर्षभरापूर्वीच्या या गोष्टीला पुन्हा एकदा नव्याने सादर करण्यात आले. ट्रेलर अनावरणावेळी घातलेल्या ड्रेसमधला दीपिकाचा एक अंमळ अश्लील फोटो सदर वृत्तपत्राने वेबसाइटवर झळकवला. अन्य अभिनेत्री चालवून घेतील तसाच हासुद्धा खपेल, अशी त्या वृत्तपत्राची अपेक्षा होती. परंतु दीपिकाने ठामपणे पुढे येत फोटो झळकल्यानंतर थोडय़ाच वेळात ‘ट्विटर’वर आक्षेप नोंदवला आणि आपल्या स्त्रित्वाचा सन्मान राखला. माध्यमांच्या सवंगपणाविरोधात दीपिकाने ‘ब्र’ उच्चारताच लागलीच बॉलिवूडसह सर्व थरातून दीपिकाला पाठींबा मिळाला. पण, दीपिका इतक्यावरचं न थांबता फेसबुकवर तिने ब्लॉग लिहिला आहे. एखादी स्त्री लैंगिकसंबंधास तयार आहे हे समजण्याचे एकचं चिन्ह आहे आणि ते म्हणजे तिने म्हटलेले ‘हो’. आनंदी जगाच्या दिशेने वाटचाल करताना असमानता, बलात्कार, भीती आणि त्रास याबाबत भारतीयांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी आपण सर्वजच जण प्रयत्न करत आहोत. आणि त्याचसाठी मी हे लिहित आहे.
मला माझ्या कामाची चांगलीच माहिती आहे. माझ्या कामात आमच्याकडून खूप अपेक्षा केल्या जातात. एखाद्या भूमिकेची मागणी असेल की मी पूर्ण कपड्यांमध्ये दिसायला हवे किंवा नग्न अवस्थेत पण एक अभिनेत्री म्हणून ती भूमिका स्वीकारावे की नाही हा पूर्णपणे माझा निर्णय राहिल, असंही तिने लिहिले आहे. जी भूमिका मी स्वीकारते ती समरसून करणे हे माझे कर्तव्य आहे. पडद्यावरील भूमिका आणि ख-या जीवनात फरक असतो हे समजून घेण्याची गरज आहे. स्त्रीचे स्तन किंवा शरीराचा इतर कोणताही भाग हा बातमीचा विषय होऊ शकत नाही. बातमी कोणत्या संदर्भात लिहिली जात आहे आणि ती बातमी विकण्यासाठी तिचा संदर्भ किती बदलला जात आहे हे महत्त्वाचे आहे, असे दीपिकाने म्हटले आहे.
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्रींबाबत असे प्रकार घडले असूनही त्याविरोधात कोणी आवाज उठवला नव्हता. परंतु दीपिकाच्या या प्रकरणामुळे या प्रकारास आळा बसेल, अशी आशा करायला हरकत नाही.
दीपिकाचा ब्लॉग : स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग हा बातमीचा विषय नाही
स्त्रीचे स्तन किंवा शरीराचा इतर कोणताही भाग हा बातमीचा विषय होऊ शकत नाही.
First published on: 19-09-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone blogs on cleavage row asks do we zoom in on the mans crotch