बॉलीवूड दीवा दीपिका पादुकोण सध्या यावर्षातील पुरस्कारांमध्ये व्यस्त आहे. १४ जानेवारी २०१४ला होणा-या २०वा वार्षिक स्क्रीन पुरस्काराने या हंगामातील पुरस्कारांना सुरुवात होणार आहे.
फोटोगॅलरीः स्क्रीन पुरस्कार सोहळा पूर्वतयारी
२०१३ हे वर्ष दीपिकासाठी यशस्वी ठरले. लागोपाठ चार हिट चित्रपट देणा-या दीपिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात चेन्नई एक्स्प्रेस आणि गोलियो की रासलीला राम लीलाकरिता स्क्रीन पुरस्कारामध्ये नामांकित करण्यात आले आहे. या पुरस्कारावेळी ती राम लीलामधील नगाडा संग ढोल या गाण्यावर थिरकणार आहे. याचाच सराव तिने वांद्र्यातील बीकेसी येथे रविवारी संध्याकाळी केला.
उद्या संध्याकाळी होऊ घातलेल्या स्क्रीन पुरस्कारावेळी दीपिका कोणत्या ड्रेसमध्ये दिसणार, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader