बॉलिवूडमध्ये २०२० हे वर्ष खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षांत अनेक मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या वर्षांत अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असल्यानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

अक्षय सलमाननंतर आता दीपिका आणि अजय देवगण असा सामना बॉक्स ऑफिसवर रंगणार आहे. गेल्या आठवड्यात अजय देवगणनं आपल्या आगामी ‘तानाजी’ चित्रपटाची तारीख जाहीर केली तर नुकतीच दीपिकानंदेखील तिच्या चित्रपटाची तारीख जाहीर केली. हे दोन्ही चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. अजयसाठी ‘तानाजी’ हा खूपच महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. स्वराज्याच्या इतिहासातील शूर योद्धे तानाजी मालुसरे यांच्या चित्रपटासाठी अजय खूपच मेहनत घेत आहे. विशेषत: अजयचे सर्व मराठी चाहते या चित्रपटाची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत.

https://twitter.com/deepikapadukone/status/1110022041950920710

हा चित्रपट आधी २७ डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार होता. मात्र, अजयनं ट्विट करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे कळवले आहे. तर याच दिवशी दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. ‘छपाक’ चित्रपट हा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या संघर्षावर आधारलेला आहे. या चित्रपटातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट देखील १० जानेवारीरोजीच प्रदर्शित होत आहे.

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर नवीन वर्षाच्या सुरूवातीला दीपिका विरुद्ध अजय अशी टक्कर पाहायला मिळणार हे नक्की. मात्र चित्रपटाची आर्थिक गणितं पाहत कदाचित या दोघांपैकी एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख भविष्यात बदलू देखील शकते.  दीपिका अजयबरोबर २०२० मध्ये सलमान आणि अक्षय यांच्यामध्येही टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण अक्षयचा ‘सुर्यवंशी’ आणि सलमान खानचा ‘ईन्शाल्ला’ हे दोन चित्रपटही ईदला प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे २०२० या वर्षांत अनेक सुपरस्टारची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार हे नक्की!

Story img Loader